...
...

श्री नवल किशोर राम,
जिल्हाधिकारी पुणे
collector.pune@maharashtra.gov.in

अधिकारी

  • Circle Image
    डॉ. जयश्री कटारे
    निवासी उपजिल्हाधिकारी
  • Circle Image
    श्री प्रल्हाद नाना हिरामणी
    तहसिलदार महसूल

जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे महसूल व आस्थापना शाखेतून राबवलेजाणारे एक विशेष उपक्रम -

सेवा अभिलेख अद्ययावतीकरण व संगणकीकरण तसेच सेवा पुस्तक व रोस्टर व्यवस्थापनाची एक विशेष प्रणाली.

या प्रणालीमध्ये अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, लिपीक-टंकलेखक, तलाठी व इतर संवर्गातील कर्मचारी याचे संपूर्ण सेवा अभिलेख सहजरित्या अद्ययावत करता येते.

या माहिती सोबत लागणारे गरजेचे कागदपत्र उदा. कर्मचारी याचे फोटो व सही, नियुक्ती / पदोन्नतीचा आदेश, जात वैधता प्रमाणपत्र , शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र असे इतर विविध कागदपत्रे अपलोड करून संबंधित माहितीशी लिंक करता येते.

ही सर्व माहिती संकलित करून कार्यालयात लागणारे विविध मासिक अहवाल, सेवा जेष्ठता यादी (बदल्या / पदोन्नती करीता), रोस्टर व इतर अनेक आवश्यक अहवाल या प्रणालीद्वारे उत्पन्न करता येते.

या प्रणालीद्वारे कर्मचारी त्याच्या नोंदणीकृत मोबाइलवर ओटीपी प्राप्त केल्यानंतर त्याची माहिती पाहू शकतात.

या प्रणालीचा वापर करून जिल्हा / तालुका पातळीवरील कार्यालयाकडून कोणतीही आवश्यक माहिती जमा करणे सोपे होईल.